श्री वेताळ महारुद्र संस्थान

गोमंतकातील देवालयाबद्दल विचारवंतांचा दृष्टिकोन

भारतखंडात मोठमोठे सम्राट चक्रवर्ती होऊन गेले. त्यांची साम्राज्ये नष्ट झाली, लुप्त झाली, तथापि सर्वांनी बांधलेली देवालये आजवर टिकून आहेत.

गोमंतकात इ.स. पूर्वी साठव्या शतकांत, तत्कालीन राजकर्त्यांच्या स्थिती व धर्मसहिष्णुतेमुळे अनेक देवालये उभी राहिली.

विविध राजवंशांच्या अस्तानंतरही सासष्टी आणि बारदेश या तालुक्यांतील देवालये स्थलांतर करून सुरक्षित ठेवण्यात आली.

देवालयांची उभारणी म्हणजे भक्तीचे प्रतीक आहे. येथे केवळ देवपूजा नव्हे, तर समाजजीवनाची संस्कृती घडविण्याचे कार्य घडते.

देवालये म्हणजे इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचे केंद्र. ती केवळ श्रद्धेची स्थाने नसून सामाजिक ऐक्य निर्माण करणारी ठिकाणे आहेत.

आमच्या पूर्वजांनी पूजापद्धती जपून, सर्व प्रकारच्या साधनसामग्रीचा वापर करून जी नवीन देवालये बांधली, ती आजही तितकीच टिकून आहेत.

त्यामुळे भारतीय आणि विशेषतः गोमंतकातील सांस्कृतिक गुणवैशिष्ट्ये आजही जिवंत आहेत. हीच आपली खरी ओळख आहे.

प्रत्येक पिढी आपली संस्कृती पुढील पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करत असते. या प्रक्रियेत देवालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.