Calendar
About Vetoba  |  Utsava Patrika  |  Karyakram Patrika  |  Donations  |  Mahajan  |  Contact Us  | 
 Welcome

About Us >> श्री वेताल कवच Back
श्री वेताल कवच
श्री गणेशाय नम:।। श्रीसरस्वत्यै नम:।। श्री भगवत्युवाच।।भूतनाथ महादेव
शंभोत्व भक्तवत्सल।। कवच ब्रहु सर्वेश वेतालस्यं प्रियंकरं।।1।।
श्री भगवान्‌ उवाच।। शृणु भगवति प्रेम्णा वेताल कवचं शुभं।।
यस्य स्मरण-मात्रेण प्रद्रवंति पिशाचका: धायेद्वेंतालमधिपं।।2।।
भूतनामभयंकरं।। मूल मंत्रैण वै न्यासंकृत्वा संपूजयत्तत:।।3।।
गुरूत्वेनप्रकारेण तंत्रोक्तविधिना दधेत्‌।। मध्यरात्रे चतुर्दश्यां कृष्णाष्टम्याम थापिवा ।।4।।
रक्तांबरंघरोमौनी शैवगंधाष्टकार्चित:।। कृष्णागरुगुगूलाभ्यां धूपितपश्र्चिमामुख: ।।5।।
वेताळ महारुद्र शिरोडकर देवस्थानांत प्रतिवार्षिक उत्सव
चैत्र : संवत्सर प्रतिपदा, शुक्ल अष्टमी, नवमी (श्रीरामजन्मोत्सव) समाराधना, पौर्णिमा शिबिकोत्सव, अमावस्या शिबिकोत्सव
वैशाख : शुक्ल तृतिया (अक्षयतृतिया), वसंतपूजा, पौर्णिमा शिबिकोत्सव.
जेष्ठ : पौर्णिमा शिबिकोत्सव
श्रावण : प्रत्येक रविवार रात्रौ रंगपूजा; कोणत्याही एका सोमवारी श्रीलक्ष्मेश्र्वर याची पूजा.
भाद्रपद : श्री गणेश चतुर्थी
अश्विन : शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत नवरात्र, विजयादशमी रोजी सीमोल्लंघनास तरंगा जातात. वद्य प्रतिपदा रोजी हरिजागर प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत; अश्विन वद्य द्वादशी (श्री गुरुद्वादशी) उत्सव.
कार्तिक : पौर्णिमा आंवळीभोजन, शिबिकोत्सव; अमावस्या रोजी जत्रा, महारुद्र समाराधना, देवकार्य, खांद्यावरील गुडयांचा रथोत्सव. नंतर रात्रौ 12 वाजतां शिबिकोत्सव
मार्गशीर्ष : शुक्ल प्रतिपदा काला, रात्रौ शिबिकोत्सव; गोपालकाला; गौळणकाला; पौर्णिमा शिबिकोत्सव.
पौष : पौर्णिमा शिबिकोत्सव.
माघ : पौर्णिमा शिबिकोत्सव.

फाल्गुन : शुक्ल सप्तमी शिबिकोत्सव. वर्धापन दिना निमित्त श्री वेताळ देवाची स्वारी पालखीत बसून ज्या जागी श्री वेताळ देवाची जुनी लाकडी मूर्ती विसर्जन करून त्यावर पार किंवा पेड बांधलेले आहे त्या जागेंवरून जाऊन येतें; वद्य एकादशी ते अमावस्या पांच दिवशी शिमगा उत्सव. देवस्थानांत जो रात्रौ शिबिकोत्सव होत असतो त्या वेळीं पालखी रात्रौ अंदाजे 8 वाजतां संचार मिरवणुकीस प्रारंभ होत असतो. आणि त्या संचारांत वाटेंत ठरलेल्या ठिकाणीं आठ पेणीं (मुक्काम) होतात. चैत्र महिन्यांत शुक्ल अष्टमी, नवमी श्रीरामजन्मोत्सव, दशमी समाराधना. हे तीन दिवस, ज्येष्ठ महिन्यांत करावयाची ज्येष्ठ पूजा आणि कार्तिक महिन्यांत पौर्णिमा रोजी आंवळी भोजन, महारुद्र समाराधनासहित, आणि देवकार्य ही देवकृत्यें या देवस्थानचे कुळावी महाजन श्री. येसू प्रभू शिनारी मुक्काम रायबंदर हे आपल्या हयाती पर्यंत नियमितपणे प्रतिवर्षी साजरा करीत आले आणि त्यांच्या पश्चात्‌ त्यांचेच वंशज वारसदार ते उत्सव प्रतिवर्षी नियमितपणें मोठ्या उत्साहानें साजरे करतात.

श्री. मोहन मंजनाथ पंडीत यांच्या हस्ते आज दिनांक २९ फेब्रुवारी २०१२ रोजी सदर संकेतस्थळ (Website) अर्पण करण्यात येत आहे.

2012 - 24, All rights reserved, Vetal Maharudra Mulgaon Santhan, Goa, India.
Maintained by Infotools® , Pune   |   *Last updated on :   |   Add this Website to favorites !