गोमांतकांतील प्रत्येक देवस्थानांत प्रसाद कौल घेण्याची वहिवाट आहे. गृहस्थाश्रमी, कुटुंबवत्सल इसमास संसारांत नानाविध बरे वाईट प्रसंग, संकटकाल जसे येतात, त्याचप्रमाणें कुटुंबांत
मंगलकोर्ये होतातच. अशा प्रसंगांत मार्गदर्शनाची आपल्या कुलदैवताकडून मिळविण्याची वहिवाट परंपरेने पिढ्यानपिढ्या आतांपर्यंत चालत आलेली आहे. प्रसाद-कौल घेणें हा प्रत्येकाच्या
दृृढ श्रद्धेचा विषय आहे. या देवस्थानांत प्रमुख दैवत श्री वेताळ; या दैवतास जसे प्रसाद लावतात त्याचप्रमाणें श्रीव्हडली वनदेवता, श्रीधाकटी वनदेवता, श्रीरवळनाथ आणि श्रीभगवती या
ही दैवतांकडे प्रसाद कौल घेण्याची वहिवाट आहे. श्रीवेताळ दैवतास जी प्रसाद पूजा लावतात ती पूजा सालई नांवाच्या झाडाच्या पानांचे तुकडे करून लावतात. ज्या ज्या दैवताचा कुळावी
महाजन असेल तो प्रामुख्याने आपल्या कुलदैवताकडे प्रसाद कौल घेत असतो. पण त्यास इतर दैवतांकडेही प्रसाद-कौल घेण्याची मोकळीक आहेच. वर्षातून कांही ठराविक तिथी दिवसांत
ते प्रसाद-कौल येत नसतात. याची माहिती मुद्दाम खाली दिली आहे.
|